web-ads-yml-728x90

Breaking News

कंगनाने महाराष्ट्राला शहाणपण शिकवण्याची गरज नाही- आमदार आशिष शेलार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

कंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत भाजपाला त्याच्याशी जोडणं दुर्देवी व चुकीचं असल्याचं शेलार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नसल्याचेही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवले. आशिष शेलार म्हणाले की सुशातसिंग राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणं या चौकशीला वेगवेगळ्या दिशेनं नेता येईल तेवढा प्रयत्न काही राजकीय मंडळी वारंवार करत आहेत. हे महाराष्ट्र व देश बघतो आहे. आजच ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही मांडत आहोत. कंगना रणौतने मुंबई मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारं कुठलंही वक्तव्य कंगना रणौतने केलं असेल किंवा केलेलं आहे त्याच्याशी भाजपाला जोडणं दुर्देवी व चुकीचं आहे. आम्ही त्याच्याशी असहमत आहोत. असे मत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे

 

No comments