BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
आरोग्य विभागाच्या
अहवालानुसार महाराष्ट्रातील कोविड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा
म्हणून धुळे पहिल्या स्थानी असून कोविड मुक्तांचे प्रमाण जवळपास 85 टक्क्यांवर तर
कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा अग्रस्थानी असल्याने वैद्यकीय शिक्षण
मंत्री अमित देशमुख यांनी सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानसुार
धुळे येथील कोविडमुक्तांचे (Recovery Rate) प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे
जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण
सुरुवातीला 100 टक्के होते मात्र आता यात सुधारणा होऊन हा मृत्यू दर 2.66%
इतका खाली आला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे आणि
मालेगाव येथे कोविड -19 परिस्थितीशी निपटण्यासाठी खास नेमणूक केलेल्या अधिष्ठाता
डॉ.पल्लवी सापळे यांच्यासह प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र डॉ.
निर्मलकुमार खंदळे, प्राध्यापक व विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ.राजेश सुभेदार,
कोविड समन्वयक डॉ.दीपक शेजवळ, सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सिग स्टाफ, सर्व कर्मचारी
यांचे अभिनंदन केले आहे.
Post a comment