web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ॲन्टीजेन चाचण्यांवर भर द्यावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढविण्यात यावे. जिल्ह्यासाठी चार अंकी हेल्पलाईन क्रमांक निर्माण करावा. जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेतला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

No comments