0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करताना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटुंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक किट तयार करण्यात आले. या किटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

 
Top