0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी ३३ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  दि.२२ मार्च ते १७ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,६०,१७४  गुन्हे नोंद झाले असून ३५,०८६ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी  २५ कोटी ३३ लाख २८  हजार २१४ रु. दंड आकारण्यात आला.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३५८ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

 
Top