0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |

 ठाण्यातील वर्तकनगर मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. पोलिस वसाहतीच्या सर्व इमारतीचा पुनर्विकास म्हाडा करणार असा निर्णय बैठकीत पार पडला. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तसेच सचिव, गृहसचिव आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. (Thane Police Colony Re-develop by MHADA)गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.तर उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावला आहे. त्यामुळे सबंध पोलीस दलातून आव्हाड यांचे आभार मानले जात आहेत.

Post a Comment

 
Top