0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह - ठाणे |

कोव्हीड कालावधीत रूग्णांची मोठया प्रमाणात वाढ झाली असताना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात एमडी फिजीशीयन  डॉक्टर नव्हते व्हेल्टीलिटर उपलब्ध असताना 70 बेडची उपलब्धता असलेल्या मुरबाड ग्रामीण रूग्णालयातुन रूग्ण ठाणे सिव्हील येथे न्हावे लागत होते.अनेकाना एमडी फिजीशियन डॉक्टर उपौचाराविना मृ्त्यु पत्कारावा लागत होता या गंभीर समस्याकडे आमदार किसनराव कथोरे मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला होता.

त्याची दखल घेवुन स्थानिक आमदार किसनराव कथोरे यांनी तात्काळ दखल घेवुन मुरबाड ग्रामीण रूग्णालयाला सोमवार ते गुरूवार असे चार दिवस एमडी फिजीशीयन डॉक्टराची नियुक्ती केली आहे.जनसमस्यासाठी आमदार किसनराव  कथोरे मुरबाड विकासमंच ट्रस्ट नेहमीच आक्रमक असते त्यांच्या मागण्याचा साकात्मक निर्णय घेवुन तात्काळ कारवार्इ केल्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे पालकमंत्री एकनाथजी शिंदे आमदार किसनराव कथोरे,डॉ.गौरी राठोड उपसंचालक आरोग्य सेवा मुंबर्इ मंडळ ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक ठाणे यांचे विकासमंचच्या वतीने आभार मानले आहेत.आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभा श्रेत्र विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ नामदेव शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यानी 03/09/2020 रोजी मुख्यमंञ्याना रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता दि.08 /09/2020 रोजी या मागणीचीपुर्णता करून डॉ.शशीकांत दोडे जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग यांची सोमवार ते गुरूवार अशी चार दिवस मुरबाड ग्रामीण रूगणालयात नियुक्ती करून शासनामार्फत आंदोलन मागे घेण्याची विनंती पत्र ज्योतीतार्इ शेलार यांना दिले आहे.राज्यशासन आरोग्यसेवा मुंबर्इ मंडळ ठाणे जिल्हाचिकित्सक ठाणे स्थानिक  आमदार किसनराव कथोरे यांचे जनहितार्थ आभार मानुन रास्तारोको आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे.मुरबाड मध्ये दोन हजाराच्यावर कोव्हीड रूग्ण आढळून आले.ट्रामाकेअर सेंन्टर मध्ये तातडीने 70 बेडचे कोव्हीड 19 हॉस्पीटल उभी करून रूग्णांना उत्तम सेवा दिली जाते.7 व्हेल्टीलीटर देण्यात आले मात्र व्हॅल्टीलीटर लावण्यासाठी रूग्णावर उपौचार करण्यासाठी गेले 7 महिने एमडी फिजीशीयन शासन देवू शकले नव्हते त्यामुळे उपौचाराविना रूग्णांना पुढे मृत्युमुखी पडावे लागत होते सदरची गंभीर समस्या आमदार किसनराव कथोरे मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ नामदेव शेलार व त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकार्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी राज्यशासनाकडे तक्रार करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सदर वृत्त स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेलवर प्रकाशित झाले होते.

 

 

Post a Comment

 
Top