0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची भविष्यातील गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवावे. तसेच इतर व्यावसायिक कारणांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व वैद्यकीय कारणांसाठी लागणारे ऑक्सिजन याच्या वितरणाचे योग्य नियोजन करावे. असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात  त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनिल भारद्वाज यांच्यासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार उपस्थित होते.राज्यातील कोविड-१९ च्या ११ टक्के रुग्णांच्या उपचारासाठी  ऑक्सिजनची आवश्यकता भासते. इतर रुग्णांना लागणारे ऑक्सिजन मिळून सुमारे ८०० मेट्रिक टन एवढे ऑक्सिजन लागते. सध्या  एक हजार मे.टन पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येऊ नये, मात्र वाहतूक व वितरण व्यवस्थेतील अडचणीमुळे काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतूकदार यांनी वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजुंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Post a Comment

 
Top