0


BY,कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह | 

मुरबाड तालुक्यातील घोरले गावात दि.७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निमगरचे लावण्यात आलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झाले आहे.अगोदर कोरोनामुळे संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा अतिवृष्टीच्या पावसाच्या थैमानात सापडले असल्याने संपूर्ण शेतकऱ्यांनी मुरबाड तहसिलदार यांना तात्काळ पंचनामा करुन झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी विनंती अर्ज केला आहे.घोरले गावात १०० टक्के भात शेती व अन्य लागवडीचे ९० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते.अशावेळी कर्जबाजारी,उसणेपणा शेतकरी पुन्हा अतिवृष्टीच्या सावट्यात सापडल्याने मुरबाड तहसिलदार यांनी संबंधित तलाठी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.सदर अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकरी हा नुकसानीमध्ये दिसून येत असल्याचे चित्र जादा अतिवृष्टी पाऊस पडल्याने शेतकरी भात फुलले असल्याच्या निदर्शनावरुन दिसून येत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भात शेतीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे केल्यास नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गांनी तहसिलदार मुरबाड यांचेकडे विनंती अर्ज केले असल्याची माहिती घोरले ग्रामस्त व शेतकरी किसन भोईर यांनी दिली आहे.

Post a Comment

 
Top