BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात
पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही
परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज वर्षा येथून
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी
दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव
संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव
सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,
प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय,
राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल
आदींची उपस्थिती होती.
Post a comment