0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपल्यामधला आविर्भाव, दुसऱ्यांबरोबर वागण्याची पद्धत, संवाद, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधले नाते आणि नीतिमूल्य यांची नितांत आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

देशातील सर्व वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच सर्व जनतेसाठी उपयुक्त पुस्तक बियोंड मेडीसिन : ए टू ई फॉर मेडिकल प्रोफेशनल (Beyond Medicine: A to E for Medical Professionals)हे पुस्तक आज ऑनलाईन प्रकाशित झाले. या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचे http://www.parthlive.com यावर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, पुस्तकाचे लेखक कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. संदीप माने, डॉ. सुनील थितमे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Post a Comment

 
Top