web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२२ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे शासनाच्या एकूण रुपये १५०० कोटींच्या ४.४५ % महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज , २०२२ च्या ( दिनांक १० जून २०२० रोजी उभारलेल्या ) रोखे विक्रीची सूचना दिली आहे . विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहील . तसेच राज्य शासनाच्या क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय , दिनांक १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील .कर्जाचा उद्देश – कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल .  भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २ ९ ३ ( ३ ) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे . कार्यप्रणाली : -शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक , फोर्ट , मुंबई ४०० ००१ द्वारे दिनांक १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय , परिच्छेद ६.१ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल .अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान , राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र .१० / अर्थोपाय , दिनांक १६ , में , २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार ( सुधारित ) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल . मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल .

No comments