BY - युवा महाराष्ट्र लाइव- सांगली |
कोरोनाविरूध्दच्या लढ्यासाठी
सर्वात मोठी गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून
प्रशिक्षित स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व
वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे
प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी
केले.राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ
प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे
संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन
संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित
होते.
Post a comment