BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना
शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.
मुंबई विद्यापीठात आज
परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार
परिषदेत बोलत होते. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून
एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये
विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Post a comment