0

 

BY - विशेष प्रतिनिधी युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड |

मुरबाड कोव्हीड सेटंरचे प्रमुख तसेच मुरबाडचे नावलौकिक डॉ.प्रमोद पष्टे यांच्यावर काल रात्री अज्ञातांनी हल्ल करण्याचा प्रयत्न केला आहे.सुदैवाने कोणतीही हाणी झाली नसल्याचे सुत्रांकडून समजले आहे.डॉक्टावर हल्ला करण्याची वेळ आल्याने माणसातील वृत्ती ही कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.एकीकडे कोरोनाशी दोन हात करतांना कोरोना योध्दा म्हणून डॉक्टरांची भुमिका देवरूपी ठरली आहे.लोकांना जीवनदान देण्यात भतलावरील देव म्हणजे डॉक्टर असे म्हणायला हरकत नाही कारण देवानेही दार बंद केले असून कोरोनाशी जमीनवरील डॉक्टर रूपी देवच नागरिकांच्या हाकेची साथ बनला आहे अशातच डॉक्टरावरच हल्ला म्हणजे देवावर हल्ला असे म्हणणं वावगं ही ठरेल.हल्ला करण्याचा प्रयत्न कट रचून केला की रोषातून करण्यात आला हे अद्दयापही कळाले नसून घडलेली घटना गंभीर असल्याचे समजते.घटना घडली तेव्हा डॉ.प्रमोद पष्टे व त्यांचे सोबत असणारे सहकारी या हल्ल्याच्या कटेतून बचावले असून सदर घटनेचा सर्वत्र डॉक्टरांनी एकत्रीत येऊन निषेध व्यक्त करून त्या अज्ञात आरोपीताविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी जोर धरून केली आहे.मुरबाडला डॉक्टर लाभत नाही,लाभला तर टिकू देत नाही आणि टिकला तर हल्ल्यासारखे प्रकार होतो अशातच सर्वांच्या सुरक्षेची ढाल म्हणून कोरोनाशी लढणार्या त्या डॉक्टरांचे संरक्षण वार्यावरच असून डॉक्टरांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनू लागला असल्याने डॉक्टरांना अडविण्याचा डाव सध्या जोमात आहे.हात दिसेल तिथे हंतरून पसरविले जात असून खाटेचा विचार कोणीच करित नाही तसेच कोरोना प्रादुर्भावात खाजगी दवाखाण्यात आमचा पेशंट बरा झाला पाहिजे आणि पैसेही दिले नाही पाहिजे,दिले तरी कमी घेतले पाहिजे अशी विचारशैली असताना हल्ल्यासारखे प्रकार घडल्याने याची गंभीर दखल शासनानी घ्यावी,तसेच असे कोणतेही कृत्य घडल्यास योग्य ती कडक कारवार्इ करावी असे सर्व डॉक्टरांनी निषेध व्यक्त करित सांगितले आहे.

Post a comment

 
Top