0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपुर |

नागपुरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( मेडिकल ) कोरोना रूग्णासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात यावी, सतराशे पैकी एक हजार खाटा फक्त कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.सकाळी साडेदहा वाजता त्यांनी नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील कोवीड कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मित्रा यांची उपस्थिती होती.त्यानंतर त्यांनी मेडिकलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपूर व विदर्भातील मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण येथे दाखल होतात. त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध असल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण परत जाता कामा नये. तसेच त्याला योग्य ते उपचार मिळाले पाहिजे. त्यासाठी केवळ कोविड समर्पित खाटांची संख्या 1 हजार संख्येपर्यत ‘मेडिकल ‘मध्ये वाढविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.साठ वर्षांपेक्षा अधिक वय व श्वसनासंदर्भातील आजार असणारे डॉक्टर वगळता सर्व स्तरातील वैद्यकीर्‍यांना या काळात आपली सेवा द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना आठ तासांची शिफ्ट सक्तीची करा तसेच सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी देखील कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Post a comment

 
Top