0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी काढले. जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी मंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे सेंटर अद्ययावत असून कोविड काळात याची आवश्यकता होती. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या विरोधात प्रत्येकाला लढायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या संकल्पनेतील माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांची अमंलबजावणी करून आपण कोरोना सारख्या जागतिक महामारी विरोधात यशस्वीपणे लढा उभारू असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top