BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
कोविड- १९ विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये
बदल करणे आवश्यक झाले आहे. यासाठी येत्या १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘माझे कुटुंब,
माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ‘माझे कुटुंब,
माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या १५ तारखेपासून राबविण्यात
येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी
झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल
परब, आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे
आयुक्त इकबाल चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.
Post a comment