BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
विद्यार्थी आणि
पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी
विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव
कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी
सांगितले.श्री. सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध
सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि
पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला
होता. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा
लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
Post a comment