0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आज त्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, येथील जिल्ह्यांच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करा यासाठी सूचना केल्या.औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सशी संवाद साधून वैद्यकीय उपचार व इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करावी . पालक सचिव यांनीदेखील याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्या दृष्टीने पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांनी संपर्कात राहावे असेही ते म्हणाले.

Post a Comment

 
Top