Breaking News

पांडुरंग रायकरच्या प्रश्नावर अजित पवार गप्प..?

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- पुणे |

कोरोना व्हायरसचा कहर दर दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रायकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पालकमंत्री अजित पवारांनी माध्यमांकडून यासंदर्भाती प्रश्न विचारला जाताच त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली. पांडुरंग रायकर मराठी वृत्तवाहिनी टीव्ही ९ मध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान रायकर यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

No comments