BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
कोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची
पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस
अधिकारी यांसह
जनसामान्य कोविड योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे
सत्कार करण्यात आला.स्पंदन आर्ट्स संस्थेने आयोजित केलेल्या कोविड योद्ध्यांच्या सत्कार
सोहळ्यात डॉ. जलील परकार, डॉ. शशांक जोशी, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, पोस्ट मास्तर
मुंबई सर्कल स्वाती पाण्डे, पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, योगशिक्षिका सुनैना रेखी
यांसह स्मशान भूमी व कब्रस्तान कर्मचारी, स्वच्छता कर्मी, पोस्टमन, फळ-भाजी विक्रेते,
मोक्षवाहिनी चालक यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Post a comment