web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचे नामवंत डॉ.राजन पोरे यांची कन्या झी मराठी वाहिणीवरील " लाडाची मी लेक गं " मालिकेत...

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड |

मुरबाड तालुक्यात ज्यांनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डनि म्हणून पदभार स्विकारला व नागरिकांच्या सेवेसी आपले संपुर्ण आयुष्य घालवून मुरबाड ग्रामीण रूग्णालय महात्वपुर्ण योगदान दिले असे अभ्यासू  व्यक्तीमत्व म्हणून डॉ.राजन पोरे यांचे नाव आजतागायत प्रभावी व नामवंत चर्चेत राहिले आहे.त्यांच्या डॉक्टर क्षेत्रातून सामाजिक कार्याचा ठसा संपुर्ण मुरबाड तालुक्यास अन्य तालुक्यात,जिल्हयात उमटला असून त्यांच्या कार्यशैलीची वाटचाल त्यांच्या कन्यानी जनमानसातून करून थेट झी मराठी वाहिणीवर एका मराठी मालिकेत प्रॉडयुसर व क्रियेटिव्ह म्हणून गरूड झेप घेतांना दिसल्या आहेत.


सदर मालिका 14 सप्टेंबर 2020 रोजी झी मराठीवर संध्या.7 वा सुरू होणार असून अमृता राजन पोरे हे ए..आर.प्रॉडक्शन हाऊस निर्मित " लाडाची मी लेक गं " नर्सच्या भुमिकेत दिसणार आहेत.ध्येय ठरवले तर व्यक्ती जग जिंकू शकते तर अशक्य गोष्ट शक्य करू शकते असा माणसी ध्यास अमृता राजन पोरे यांची झी मराठी वाहिणीवरील सुरू होणार्या नव्या " लाडाची  मी लेक गं " या मालिकेतून भुमिका साकारत सिध्द केले आहे.अमृता यांच्या पाठिशी डॉ.राजन पोरे व त्यांच्या कुटूंबाचा आशिर्वाद व जनसामान्यांचे प्रेम,आपुलकी असल्यानेच हे सिध्द झाले आहे.

या नव्या मालिकेतही डॉ.राजन पोरे यांच्या डॉक्टरकीची प्रेरणा अमृता यांनी कशी असावी,घर माहेरचे असो कि सासरे सुन नव्हे तर लेक म्हणून घराचा वसा आणि आपली माणसं त्यातच आपली जबाबदारी सांभाळण्याची भुमिका पार पाडण्यासाठी काय करता येर्इल हे एका ट्रेलरमधून स्पष्ट झाले असून या झी मराठी वाहिणीत " लाडाची मी लेक गं " मालिकेत अमृता राजन पोरे या कशा पध्दतीने आपली जबाबदारी आणि घराचा वसा सांभाळणार,रागिट सासू केव्हा प्रेमळ सासू होणार यासाठी सर्वांनी आवर्जुन " लाडाची मी लेक गं " ही मालिका दररोज संध्या 7.वा पाहायला विसरू नका असे आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी तसेच स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगितले आहे.अमृता राजन पोरे यांच्या पुढिल वाटचालिस आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र,आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार तसेच सर्व कमिटी सदस्य यांच्याकडून मनपुर्वःक शुभेच्छा देण्यात आले आहे.

No comments