0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन’ या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या राज्यपाल परिषदेतील चर्चासत्रामध्ये राजभवन, मुंबई येथून सहभागी होताना राज्यपालांनी असे प्रतिपादन केले.

डॉ.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी आहे. शैक्षणिक  धोरणाला कृतीमध्ये उतरवताना सदाचार व संस्कारावर भर द्यावा लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

Post a comment

 
Top