web-ads-yml-728x90

Breaking News

पांडूरंग रायकर यांच्या मृत्युला किती जबाबदार !...

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुंबर्इ |

राजकीय,सत्ताधिश,प्रशासकीय यंत्रणा श्रीमंत योगी यांच्याशी लाचारपने कोरोनाचा खरा धोका कोणी वाढवला तेव्हा प्रश्न उभा राहतो.ठराविक  मोठी मिडीया उपचार,कोव्हीड सेंटर,उपचार यंत्रणा डॉक्टर,बेड,इंजेक्शने,लस,टेस्टींग,ॅम्ब्युलन्स तात्काळ उपचार सेवा आणि इतर आजारावर दुर्लक्ष  करून कोरोनावर भर याला जबाबदार सरकारचतेवढेच मागे धावणारे आपण सुध्दा.

          महाराष्ट्रात कोरोना आला.टिव्हिीवर कोरोना,कोरोना झळकला,लोकांत भिती निर्माण झाली,कायदे कानून घटना बदलत गेल्या.छोटे वृत्तपत्र,चॅनेलवरील पत्रकारांनी गरिब,गरजू,पायदळी जाणारे मजूर आदिवासी परदेशी यांची वास्तव्य मांडले त्या गडबडीत सत्ताधारी राजकारण्यांनी पत्रकारांची मुस्कुटदाबी केली.पत्रकारांत भेदभाव निर्माण केले,कायदे केले,सोशल मिडीयावर पत्रकार कोण,शासन मान्य कोण,सोशल मिडीयावर पत्रकारात छोटा मोठा भेदभाव निर्माण केल्याने पत्रकारांच्यावर केसेस हल्ले झाले.बोलती बंद म्हणून गुन्हे दाखल झाले.सारं हळूहळू होता होता पत्रकारांच्या संघटना पक्षीय दावणीला बांधले गेल्यची चर्चा झाली.मोठया पदद्दयावर सामान्य,गरिब कोरोनासह इतर रूग्णांची दकल घेतली गेली नाही.यांचा शिव्या श्राप घेतले,मिडीया म्हणजे बाजार  झाला असे म्हणणारे राजकारण्यांना सरकारला प्रशासकीय अधिकार्यांना बोगस व खरे पत्रकार निवडून त्यांच्यावर कारवार्इ करण्याची हिंम्मत झाली नाही एवढं विसरून चालणार नाही.

          गेल्या सहा महिण्यांत पत्रकारांबद्दल खुप काही एैकले,एबीपी माजा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल,पत्रकारांवर हल्ले,पत्रकारांना कोरोना,पत्रकारांना 50 लाखाचा विमा,शेवटी पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यु पण पत्रकार कोण,कोणाला 50 लाखाचा विमा दिला गेला,पुढे देणार पत्रकारांसाठी स्वतंत्र आरक्षित खाजगी सरकारी रूग्णालयात बेड त्याचा लाभ कोणाला असे बरेच प्रश्न आहेत.

          एका पत्रकार परिषदेत अजितदादा प्रश्न विचारतांना पत्रकारांवर चिडले होते.तुने मस्क घातला नाही,तुझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगू का ? त्यानंतर पत्रकाराच्या बुमवर सॅनिटायझर फवारणी मात्र,पुण्याचे पालकत्व असणार्या अजितदादा यांच्या पुण्यात पत्रकार पांडूरंग रायकर यांचा अपुरा उपचार सोयीसुविधा विना मृत्यु झाला याला जबाबदार कोण ? सरकार,अधिकारी,डॉक्टर की पालकमंत्री याची चौकशी नको गुन्हा दाखल होऊन त्या पांडूरंग रायकर यांच्या कुटूंबियांना 50 लाखाचा विमा मिळेल काय ?

          कोव्हीड सेंटर प्रत्येक शहरात प्रचंड काढले रूग्णांना जेवणाची सोय केली.औषधे मस्क पुरवणे? इमारती बांधल्या? दुरूस्त्या केल्या त्यावर काही कोटी रूपये खर्च झाले मात्र,रूग्णालयात तज्ञ एम.डी,सर्जन,फिजिशियन मेडीसन डॉक्टर नाहीत.ॅम्ब्युलन्स नाहीत,रूग्णांना नंबर लावून बेड मिळत नाही,खाजगी रूग्णालयात रूग्णांवर कोव्हीड टेस्ट केल्याशिवाय उपचारासाठी घेत नाहीत याचे टेस्टीग रिपोर्ट वेळेवर येत नाहीत.रूग्ण मृत्यु पावतात,रूग्णावर खाजगी रूग्णालयात लाखो रूपये खर्च होतात,मृत्यु पावल्यावरही बिल घेतल्या शिवाय मृत्यु रूग्ण नातेवार्इकांच्या ताब्यात देत नाहीत हाच खरा कोरोनाचा फंडा आणि फंड सार्या मिडीयाने बाहेर काढला पाहिजे तेव्हाच यापुढे दुसरा पांडूरंग बळी जाणार नाही.

          पत्रकारावर प्रशासन राजकारणी यांचा रागही असतो त्यामुळे पत्रकारावर तात्काळ व्ही.आय.पी उपचार होत नाहीत मात्र,नेते,सिनेअभिनेता यांच्या कोरोना बातम्या पत्रकार देताच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जाते ते बरे होतात आणि पत्रकार मृत्यु पावतात याचा बोध आणि शोध पत्रकारांनी एकसंग होऊन घेतला पाहिजे,सरकार आणि राजकारणी,प्रशासकीय अधिकारी यांनीच पत्रकार वाढवले,तुडविले आता मरणाकडे पाहत नाहीत यासाठी पत्रकार योध्दा आहे की गोयंदा हे ठरवले पाहिजे,पत्रकारात जागृती झाली पाहिजे असतं.निषेध चौकाशा या पुडया बंद झाल्या पाहिजेत.सरकारने मान्य असलेल्या पत्रकारांना आरोग्य सुविधा राखीव ठेवल्या पाहिजेत. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी पुढे येवून राज्याची संघटनात्मक ताकद उभी केली आहे.

 

 

1 comment: