0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Post a comment

 
Top