0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने पावण झालेल्या गुरुकुंज मोझरी (ता.तिवसा) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचायत राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, पेसा समन्वयक आणि बचत गट यांना प्रशिक्षण देण्याकरिता गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय प्रशिक्षण प्रबोधिनी येथील जागा ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेला उपलब्ध करुन देण्याबाबत आज ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top