0

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड |

डॉक्टर म्हणजे आत्ताच्या काळातील भुतलावरील देव असे मानायला हरकत नाही परंतू अलीकडे कोरोनामुळे काही खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण भागात कोरोनाच्या नावावर चांगलीच लुटमारी सुरू केली आहे.साध्या सोनाग्राफी काढण्याअगोदर कोरोना टेस्ट करून निगेटीव्ह रिपोर्ट दाखविण्याची वेळी आज आली आहे.डॉक्टर रक्ताचे रिपोर्ट काढून काही ना काही कारणे दाखविले जात असून अॅडमिट करून भरमसाठ रक्कम आकारून कोरोना टेस्ट करण्याची भिती निर्माण केले जात असल्याची चर्चा आहे परंतू त्याच डॉक्टराची कोरोना टेस्ट का करण्यात आली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून डॉक्टरांच्या परिश्रमामुळे तर एखाद्दयाला कोरोना होत नसेल ना असा सवाल केला जात आहे.उपचार घेणारा  चांगला असतो परंतू कशावरून डॉक्टराला कोरोना झाला नसेल किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याला झाला नसेल त्यामुळे त्यांची सर्वप्रथम कोरोना टेस्ट स्वॅबद्वारे घेऊन थेट शासकीय आरोग्य विभाग तसेच ठाणे सिव्हील रूग्णालयात पाठवावे तेव्हा कळेल कि किती पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह.डॉक्टरांवर प्रश्न चिन्ह येथे केला जात नसून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्नही नाकारता येणार नाही हे हि तितकेच सत्य आहे याकडे शासनानी पाठ फिरवून चालणार नाही त्यामुळे ही गंभीर बाब मानून सर्व खाजगी डॉक्टरांची कोरोना टेस्ट स्वॅब घेण्याची मागणी योग्य असल्याची नागरिकांनी म्हंटले आहे.प्रत्येकाला आजार आहे म्हणून कोरोना झाला असे म्हणता येणार नाही,प्रथम उपचार करा नंतर कोरोनाकडे वळा.पहिले कोरोना नव्हता तेव्हा व्हायरल निमोनिया,टायफार्इड,टिबी,मलेरिया हे रोग गंभीर आजार मानले जात होते परंतू एक कोरोनाचा शिरकाव झाल्यास कोणताही आजार झाला की कोरोना झाला अशी गैरसमज पकडून मलेरिया,निमोनियालाच कोरोना शिक्का मिळत आहे.ताप,थंडी,खोकला हा वर्षातून होणारा आजार आहे.त्यामध्ये एखादा रूग्ण हा पॉझिटिव्हच असतो म्हणून कोरोना झाला असे नाही कारण तो आजार साथीचाही असू शकतो आणि याचा फायदा अलीकडे कोरोना नावाखाली खाजगी डॉक्टरांनी घेतला असून खाजगी डॉक्टरांची मनमानी आणि लूटमारी थांबावी या अपेक्षाने सर्व खाजगी डॉक्टरांची स्वॅब टेस्ट व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

          पहिलेही लूटमारी व्हायची परंतू कारवार्इ होत नव्हती  आताही कोरोना नावाखाली लूटमार सर्रास सुरूच आहे.एखाद्दया उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकाला डॉक्टरच कोरोनाबाधित संशयित म्हणून पाहतो.मुळाःत त्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोना होऊन जातो पण त्याला झाला की नाही हे गुलदस्त्यात राहते त्यातच खाजगी रूग्णालयात उपचारासाठी येणार्या नागरिकांना कोरोना टेस्ट करून घ्या सांगितले जाते तर काही नागरिकांना विना टेस्टनी दाखल करून टेस्ट करून घ्या असे सांगून भिती सावटाखाली अजून जाण्याचा सल्ला देऊन कदाचित डॉक्टरामुळेच तर त्याला कोरोना होणार नाही ना अशी शक्यताही नाकारता येत नाही.त्यामुळे ग्र्रामीण भागातील गल्ली बोळातील सर्व खाजगी डॉक्टरांची चौकशी करून त्या डॉक्टरांची कोरोना स्वॅब टेस्ट घ्यावा अशी मागणी मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

 

      

Post a Comment

 
Top