web-ads-yml-750x100

Breaking News

कलाकरांना मुंबई जर पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट - मंत्री अनिल परब

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध आता सर्व स्तरावरून होऊ लागलाय.अशात परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगणाच्या वक्तव्याचा निषेध करत 'मुंबईने ज्या कलाकारांना मोठं केलं,त्याच कलाकरांना मुंबई जर पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे' अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

     आज मुंबईतील पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब  बोलत होते. त्यावेळी त्यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीसोबत करणं म्हणजे हा झाशीच्या राणीचा अपमान आहे.जर कंगना कर्तृत्ववान असेल,तर तिने तिचं  कर्तृत्व सिद्ध करावं' अशा शब्दात अनिल  परब  यांनी कंगनाचे कान टोचले.

 

No comments