web-ads-yml-728x90

Breaking News

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ६९ हजार गुन्हे दाखल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६९ हजार ६५२ गुन्हे दाखल झाले आहेत. ३६ हजार ९४७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २८ कोटी ३१ लाख ९९ हजार २६४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २५ सप्टेंबर या कालावधीतपोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६२ (८९५ व्यक्ती ताब्यात)१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार २४०अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७जप्त केलेली वाहने – ९६, ४३०कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २१५ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २३९ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.पोलिसांना कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

No comments