0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव- भिवंडी |

लाॅकडाऊन काळात सर्वच व्यवसायांवर उपासमारीची वेळ आली होती त्यामध्ये चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश होता मात्रकलाकारांना सुवर्ण संधी आणि निर्मात्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चित्रपट सृष्टीतील प्रत्येक होणाऱ्या चुकिची गोष्ट यावर आळा घालण्यासाठी देवा ग्रुप फाऊंडेशन अंतर्गत देवा ग्रुप चित्रपट संघटनेची निर्मिती काही महिन्यांपूर्वी करण्यात आली.तद्नंतर देवा ग्रुप चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कलाकारांसाठी शॉर्टफिल्म व  म्युझिक व्हिडिओ  फेस्टिवल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचा  बक्षीस समारंभ सोहळा देवा ग्रुपच्या मुंबई- नाशिक महामार्गावरील जनसंपर्क कार्यालयात पार पडला.यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विजेते उपस्थित होते.मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून  उत्कृष्ट या स्पर्धेला मिळाला.शॉर्टफिल्म आणि म्युझिक व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन देवा ग्रुप चित्रपट संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रोहित गायकवाड, सचिव - खालेद पटेल अंधारीकार सर यांनी केले होते.फेस्टिवल मधून शॉर्टफिल्म स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.कौम्यारिनी,किरण दिलीप वाघ रोख रक्कम - १०,००० रुपये द्वितीय - घरा घरात छत्रपती शिवाजी महाराज ( शाम राऊत ) रोख रक्कम - ७००० रुपये तृतीय क्रमांक - जाणीव ( भाऊ साहेब लोखंडे ) रोख रक्कम - ५००० रुपये आणि म्युझिक व्हिडिओ स्पर्धेत प्रथम - श्रावण धारा ( साई सागर एंटरटेनमेंट ) ( ७००० रुपये ) द्वितीय - माझी ताई ५००० रुपये आणि तृतीय क्रमांक - रुपाची नशा ३००० रुपये असे बक्षिसे देण्यात आले.लाॅकडाऊन काळात देखील कलाकारांना आणि निर्मात्यांना सुवर्ण संधी म्हणून या फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले. बक्षीस समारंभ प्रसंगी देवा ग्रुप फाऊंडेशन अध्यक्ष सुजित ढोले,सचिव तानाजी भाऊ मोरे,उपाध्यक्ष संदीप ठाकरे,सरपंच पराग पाटोळे,सुरेंद्र गुळवी,रवि पाटील,जिंदाल धालीवाल,महेंद्र पाटील,मोहन हरड यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Post a Comment

 
Top