0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नवी दिल्ली |

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि astrazeneca कंपनी यांच्याकडून करोनावर तयार करण्यात येत असलेली AZ1222 या लसीची चाचणी भारतात पुन्हा सुरू केली जाऊ शकते. लसच्या निर्मिती अॅस्ट्राझेनेकाची भागीदार भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) याबद्दल माहिती दिलीय. ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DGCI) मंजुरी देताच लसीची चाचणी पुन्हा सुरू केली जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलंय. एका व्यक्तीवर चाचणी दरम्यान परिणाम झाल्यानंतर AZ1222 ची चाचणी थांबवण्यात आली होती. पण आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top