0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितानुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

Post a Comment

 
Top