0

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह – ठाणे |

कोरोनानी ग्रामीण भागात थैमान घातला आहे.हॉस्पिटले फुल झाली आहेत.खाजगी डॉक्टराकडून रूग्णांची लुटमार सुरू आहे त्यातच नागरिक आपली तसेच आपल्या कुटूंबाची काळजी वार्‍यावर सोडत असून मास्क वापरत नाहीत.

          मास्क न वापरणार्‍यावर मुरबाड नगरपंचायतीने 500 रूपये दंड घेणे सुरू केले आहे.सदरची बाब ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी आमदार किसनराव कथोरे यांच्या निदर्शनास आणून दिली असता ग्रामीण भागातील एखाद्दया गरिबानी मास्क वापरला नाही तर त्याला 500 रूपये दंड भरावा लागेला.त्यांच्याकडे 500 रूपये नसल्यास काय करणार याची गंभीर दखल घेऊन आपल्या भाजपा कार्यकर्त्यांना मास्क वाटप करून नगरपंचायतीच्या कारवार्इला गांधीगीरी मदतीचा हात देण्याचे आदेश दिले आहेत.

          अनेक नागरिक 10 रूपयाचा मास्क मुद्दाम वापरत नाहीत त्यांना लाज वाटून आपल्या कुटूंबाची जबाबदारी कळावी असा संदेश यातून जार्इल अशा उपक्रमाची सुरूवात माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक,युवा महाराष्ट्र लार्इव्हचे उपसंपादक किसन अनंत कथोरे यांनी मास्क वाटप सुरू केले आहे.

          प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा,आपली तसेच आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार किसनराव कथोरे यांनी केले आहे.

 

Post a Comment

 
Top