web-ads-yml-728x90

Breaking News

209 युवक युवतीना आमदार किसनराव कथोरे यांनी दिल्या नोक-या ; आर्इवडिलांना सांभाळण्याची अट...

 

BY, मिलिंद दळवी,युवा महाराष्ट्र लाइव्ह | बदलापुर -

गेली 21 वर्षे बारवी धरणग्रस्त शेतकरी एमआयडीसीकडे नोक-या जमिनी मोबदला मागत होते त्यांच्या मांगण्या अखेर पुर्ण करण्यास आमदार किसनराव कथोरे यांना यश आले आहे.गेली अनेक वर्षे प्रलंबित नोक-याच्या मागण्यासाठी आमदार किसनराव कथोरे यांनी भाजपा सरकार कालावधीत तात्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कडुन मंजुर करून घेतल्या होत्या अशा 209 प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलाना विविध श्रेत्रात नोक-या दिल्या असुन सर्व नियुक्तधारकाना 1 नोव्हेंबर रोजी कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नाही संघटना हाताशी घेतली नाही चहाप्याले मात्र माझ्या तालुक्यातील शेतकर्‍याच्या मुलाना नोक-या देण्याचे काम फक्त आमदार किसनराव कथोरे यांनीच केले हे सिध्द करून अनेकाच्या कुटूंबाचा उर्धारनिर्वाह साधन उपलब्ध करून दिले आहे.प्रकल्प ग्रस्त बारवी डॅम शेतकर्‍याना शेती झाडे घरे यांचा मोबदला देवुन पुर्नवसन केले शिवाय त्यांच्या मुलाना नोक-या दिल्याने आमदार किसनराव कथोरे यांचे शेतकर्‍यांनी आभार मानले आहेत.आमदार किसनराव कथोरे यांनी ठाणे जिल्हयातील भुमीपुत्राना विविध श्रेत्रात नोक-या दिल्या आहेत पडघा विद्युत केंन्द्रात पुर्नवसीत शेतकर्‍याना नोक-या,धरणे,बंधारे,कारखाने आदि ठिकाणी विविध पदाच्या नोक-या मिळवुन दिल्या.माझ्या भुमिपुत्राच्या मुलाना नोक-या दिल्या त्यांनी आपल्या आर्इवडिलाना वार्‍यावर सेाडू नये अन्यथा माझ्याशी गाठ आहे.सगळयानी चांगल्या प्रकारे काम करावे.जीवनात यशस्वी व्हावे अशा सर्व नोक-या धारक मुलाच्या आर्इवडिलांची भेट घेणार आहे.असही आ.किसनराव कथोरे यांनी सांगितले.मुरबाड एमआयडीसी हॉलमध्ये नोक-याचे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

 

No comments