BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या
एकूण रुपये १००० कोर्टीच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये ५००
कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल, विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट
अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील. तसेच राज्य शासनाच्या क्र
. एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र. १० / अर्थोपाय, दिनांक १६ मे, २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण
अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील.
कर्जाचा उद्देश
:- कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग
महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी
करण्यात येईल . भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद
२ ९ ३ ( ३ ) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे.कार्यप्रणाली
:- शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँक , फोर्ट , मुंबई ४०० ००१ द्वारे दिनांक
१६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र
. १० / अर्थोपाय, परिच्छेद ६.१ मध्ये अधिसूचनेत निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार
लिलावाने करण्यात येईल.
Post a comment