0

BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
कोविड सेंटरमधील निकृष्ट भोजन, सडलेली फळे याबाबत संबंधित ठेकेदार व निरीक्षकांना सक्त ताकीद द्यावी तसेच लॉकडाऊन काळात व्यापारी व नोकरदार यांचा रोजगार बुडून ते आर्थिक संकटात असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल व गाळा भाडे माफ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळातर्फे आमदार दौलत दरोडाना निवेदन देत समस्या मांडल्या.आमदारांनी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेऊ असे सांगितले.यावेळी निवासी मंडळाचे अध्यक्ष अनिलजी निचिते, कार्याध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष रोहिदास गोदडे, उपाध्यक्ष दिनेश घरत, सचिव भानुदास महाराज भोईर व माधव भेरे उपस्थित होते.

Post a comment

 
Top