राज्यपालांनी केले भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या करोना तपासणी लॅबचे लोकार्पण
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मीरा भाईंदर येथील भक्ती
वेदांत रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे (Molecular Lab) राजभवन, मुंबई येथून
डिजिटल माध्यमातून लोकार्पण केले.जनसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देत असल्याबद्दल
भक्ती वेदांत रुग्णालयाचे अभिनंदन करताना रुग्णालयाने रुग्णांना मातृवात्सल्याने सेवा
द्यावी तसेच उत्तम रुग्णसेवेचे उदाहरण समाजापुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
भक्ती वेदांत रुग्णालय नेहमीच निस्वार्थ रुग्णसेवेला प्राधान्य देत असल्याचे रुग्णालयाचे
अध्यक्ष उद्योगपती हृषिकेश मफतलाल यांनी यावेळी सांगितले.
नव्या करोना तपासणी लॅब
मुळे मीरा, भाईंदर, वसई व पालघर येथील जनतेची व रुग्णांची उत्तम सोय होईल, असे भक्ती
वेदांत रुग्णालयाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय संखे यांनी सांगितले.
No comments