BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा
आणि एकूणच राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं भरली
आहेत.
यात काही धरणं तर 100 टक्के भरुन त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तर काही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांमधून होत असलेल्या विसर्गामुळे अनेक नद्यांनी
धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला
जात आहे. दुसरीकडे अनेक रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
Post a comment