web-ads-yml-728x90

Breaking News

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याबाबतची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली आहे. सुदैवाने माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार’,असं ट्विट अभिषेकने केलं. तब्बल 23 दिवसांच्या उपचारानंतर महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाले आहे. 11 जुलै रोजी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
No comments