web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीची गणेश विसर्जन उपयोजना दबंगगिरी पोलिसांच्या हातात;वृत्तसंकलनालाही विरोध नागरिकांची नाराजी

 

BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव्ह मुरबाड,ठाणे |

गौरी गणपती विसर्जन घाटावर मुरबाड नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारे सोयीसुविधा न ठेवता पोलिसांच्या दबंगगिरीने देव बाप्पा हिसकावून घेण्याची परंपरा जोपासल्याने नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला असुन पोलिसांच्या दबंगगिरीने कोरोना हद्दपार होर्इल का? असा सवाल केला आहे.मुरबाड नगरपंचायतीने सॅनिटाइजर मार्गदर्शन केंन्द्र उभे नकरता दोन कामगार गेटवर ठेवून भक्तांच्या हातातुन मुर्ती हिसकावुन विसर्जीत केल्या पोलिसांनी दबंगगिरी करून वृत्तसंकलन करणार्या पत्रकाराना रोखले मात्र मुरबाड बाजारपेठेत हजारो लोक मास्क न लावता खरेदीसाठी आले होते त्याकडे दुर्लक्ष केले.मुरबाड गणपती विसर्जन घाटावर कोणत्याही सोयीसुविधा स्वच्छता न करता टेबल लावुन पोलिसचौकी उभी करून बाप्पाची हिसकावणी केली मात्र विसर्जनावर नगरपंचायत किती खर्च दाखवतरे यांची उत्सुकता भक्ताना लागली आहे.

नगरपंचायत संपुर्ण कोरोना कालावधीत नसुते आदेश काढुन कोरोनावर मात करण्याचे ढोंग करत आहे.सॅनिटाइजर एैवजी रॉकेल मिश्रीत डास फवारणी केली.स्वच्छता नकरता आजारपणा वाढवली अशा नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी नागरिक आता रस्त्यावर येतील अशी चर्चा आहे.

पोलिसांचे पडदयाआड अवैध धंदे

लॉकडाऊन कालावधीत मुरबाड बाजारपेठेत आणि तालुक्यात गावठी दारू,विदेशी दारू,जुगार,मटका, क्लब,गुटखा,तंबाखू असे अवैध धंदे आजही सुरू असुन त्याचे हप्ते पोलिसाना मिळतात म्हणुनच अवैध धंदेवर कारवार्इ होत नाही.त्याकडे पोलिसांची दबंगगिरी कामा येत नाही.अनेक महिला हारवल्या एका मुलीचा आपहरण झाले अत्याचार झाला अशा घटनेकडे दुर्लक्ष करणारे पोलिस नको तेथे दबंगगिरी करून पत्रकारांना वृत्तसंकलनापासुन रोखतात खरे पोलिसच भार्इगिरी करत असून येथील लोकप्रतिनिधीनी पोलिसाच्या दबंगगिरी भार्इगिरी अवैध धंदयाना लगाम घालावी अशी पत्रकारांची मांगणी असुन नगरपंचायतीच्या कारनाम्याचे वृत्तसंकलन फोटो काढण्यास मज्जाव करणार्या त्या पोलिसावर कारवार्इ करावी या पोलिस दबंगगिरीचा केंन्द्रीय पत्रकार संघ ठाणे जिल्हयाच्या वतीने जाहिर निर्षेध करण्यात आला आहे.

 

No comments