0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

मालाड, मालवणी अंबोजवाडी येथील पारधी समाजातील 23 लाभार्थ्यांना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेतून पारधी समाज बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात येते. पारधी समाज बांधवांनी स्वयंरोजगार करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून श्री. शेख यांच्या हस्ते आज मालाड अंबोजवाडीतील पारधी बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

 

Post a comment

 
Top