0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मनाली येथील घराबाहेर गोळीबार झाल्याचे समजते आहे. याप्रकरणी कंगना रनौतच्या टीमने शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये कंगनाच्या मनालीच्या घराजवळ गोळीबार झाल्याचे आवाज ऐकू आल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेनंतर कुलू पोलिसांनी कंगनाच्या घरी जाऊन प्राथमिक तपास केला असता पोलिसांना अद्यापतरी कोणता सुगावा लागलेला नाही. मात्र पोलिसांनी कंगनाच्या मनाली येथील घरावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. हा तर मला घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे कंगनाने म्हटले आहे.


Post a comment

 
Top