Breaking News

खापरी ता.मुरबाड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न, तरुणांनी बाळगले अधिकारी होण्याचे स्वप्न


BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह मुरबाड |
मुरबाड तालुक्यातील दुर्गम अशा खापरी या गावी तारीख 12 ऑगस्ट 2020 रोजी स्पर्धा परीक्षा व पोलिस भर्ती मार्गदर्शन शिबिर सोशल डीस्टनसिंगचे यथोचित पालन करून संपन्न झाले.  या शिबिरात गावातील सर्व सुशिक्षित तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.पुढील काही महिन्यात महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठ्या संख्येने पोलीस भर्ती होणार असून या  भर्तीमध्ये आपल्या गावातील तरुणांची निवड व्हावी या हेतूने खापरी ग्रामस्थांनी स्पर्धा परीक्षा व पोलिस  भर्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खापरी गावचे भूमिपुत्र पोलीस अधिकारी श्री. विनायक गोल्हे साहेब (पोलीस निरीक्षक) यांनी उपस्थित तरुणांना पोलीस भर्ती व  इतर स्पर्धा परीक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन करताना शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा व आवश्यक कागदपत्र याविषयी मार्गदर्शन करून आपल्या  स्वतःच्या जीवनातील संघर्षमय प्रसंगाची माहिती उपस्थितांना देऊन कोणतेही यश मिळवण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम, सातत्य पूर्ण प्रयत्न, जिद्द, चिकाटी, व नियोजनपूर्वक अभ्यास केला तर आपण आपले स्वप्न निश्चीत पणे पूर्ण करू शकतो, असे सांगून माझ्या गावातील तरुणांनी प्रशासकीय सेवेत अधिकारी होऊन समाजाची सेवा करताना मला पाहायचे आहे व स्वतःच्या उद्धरा बरोबरच, गावाचा व पर्यायाने समाजाच्या उद्धारासाठी या योगे हातभार लावावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विनायक  गोल्हे साहेब यांनी केले. तसेच  गरीब व गरजू विद्यार्थ्याना आवश्यक स्पर्धा परीक्षेची पुस्तके स्वखर्चाने पुरवणार असे आवाहन केले. या शिबिरास उपस्थितकुणबी समाजोन्नती मंडळाचे सरचिटणीस प्राध्यापक श्री .प्रकाश पवार सर यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात संगत महत्त्वाची असून आपण चांगल्या संगती बरोबरच आपले आरोग्य देखील चांगले राखण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . सामाजिक कार्यकर्ते  श्री. संभाजी गोडांबे यांनी ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे सांगितले .भर पावसातही या शिबिरास गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. अशाच प्रकारचे पोलीस भर्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर तालुक्यात विविध ठिकाणी घेणार असून गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शक पुस्तके व इतर साहित्य पुरविण्याचे या शिबिराचे मार्गदर्शक श्री. विनायक गोल्हे साहेब व प्राध्यापक श्री. प्रकाश पवार सर यांनी सांगितले. या शिबिरास कुणबी समाजोन्नती मंडळाचे सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश पवार सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री .सुरेश  भांगरथ ,सामाजिक कार्यकर्ते संभाजी गोडांबे, माजी सरपंच चिंधु वाघ ,माजी उपसरपंच राजेश राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर माळी, सदस्य नितीन राऊत तसेच गावातील नवतरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोपान गोल्हे सर व आभार प्रदर्शन श्री. राजेश राऊत यांनी मानले.कार्यक्रमांसाठी व्यासपीठ व ईतर व्यवस्था शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विजय भांगरथ यांनी केली.


No comments