web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत” अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.

 

No comments