0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुंबई |

 केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशनकार्डया योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.एका शिधापत्रिकेवर देशात कोठेही धान्य उपलब्ध करुन देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, दादरा-नगर हवेली व दीव-दमण, जम्मू काश्मीर, मणिपूर, नागालॅन्ड, उत्तराखंड येथील शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध असल्याचे श्री.पगारे यांनी सांगितले. मुंबई / ठाणे शिधावाटप यंत्रणेसह राज्यातील व उपरोक्त नमूद परराज्यातील पात्र शिधापत्रिकाधारक त्यांना देय असलेले अन्नधान्य अधिकृत शिधावाटप दुकानातून त्यांच्या शिधापत्रिकेवर पोर्टबिलिटीद्वारे प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. 

Post a comment

 
Top