पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण
BY - युवा महाराष्ट्र लाइव- सांगली |
स्व.आमदार आर.आर. (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून
2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम सन 2014-15 मधून मंजूर झालेले पंचायत समिती कवठेमहांकाळ
येथील कर्मचारी निवासस्थान टाईप 2 चे आठ व अधिकारी निवासस्थान टाईप 4 चे दोन या निवासस्थानांचे
लोकार्पण स्व.आर आर आबा यांच्या जयंती निमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या
हस्ते व जलसंपदा व लाभ क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
आले.यावेळी
खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, आमदार सुमनताई पाटील, तालुका
पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती पाटील, रोहित आर आर पाटील,
यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments