BY - युवा महाराष्ट्र लाइव- यवतमाळ |
जिल्ह्यात काही तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव
मोठ्या प्रमाणात वाढत असून या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच आगामी
गणेशोत्सवाच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड
यांनी यंत्रणेचा आढावा घेतला.नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी
एम.डी.सिंह, पोलीस
अधीक्षक एम. राजकुमार, सहायक जिल्हाधिकारी भाग्यश्री
विस्पुते, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत
देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात मृत्यूचा आकडा रोजच वाढत आहे. तसेच
यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, केळापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात
रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी
तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी. हा आकडा असाच वाढत राहिला
तर तालुकास्तरीय समितीत असलेल्या सदस्यांना जाब विचारण्यात येईल. कोणत्याही
परिस्थितीत आपल्या तालुक्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी करा. त्यासाठी शासन
आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. यात कोणतीही
हयगय सहन करणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही रुग्ण एकदम वेळेवर भरती
झाले. त्यामुळे त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. मात्र जे रुग्ण १२ ते ९६ तास या
कालावधीत भरती होते, अशाही लोकांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे त्यांच्यावर उपाचाराची दिशा काय होती, त्यांचा जीव
का वाचू शकला नाही, आदी प्रश्नांची त्यांनी सरबत्ती
केली.
Post a comment