BY - महेश पंडीत,युवा महाराष्ट्र लाइव्ह – पडघा |
मागील
दहा वर्षांपासून ठाणे ,पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात शैक्षणिक, आरोग्य,
क्रीडा आणि महिला सक्षमीकरण तसेच आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ
शैक्षणिक व सामाजिक संस्थेद्वारे उल्लेखनीय कार्य
करणारे निलेशजी भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून भिवंडी तालुक्यतील ३१ गावातील
ग्रामस्थ व युवकांनी एकत्रित येऊन जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य
करण्याचे निश्चित केले.त्या सर्व गावांमध्ये जिजाऊ संघटनेच्या शाखांचे उदघाटन जिजाऊ
संघटनेचे संस्थापक श्री निलेश भगवान सांबरे आणि जिजाऊ संघटना ठाणे जिल्हा प्रमुख
सौ मोनिका मोहन पानवे यांच्या उपस्थितत मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी
शिक्षण, आरोग्य तसेच गावातील
विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ संघटना सदैव तुमच्या सोबत असेल असे आश्वासन
जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिले.यावेळी बोलताना
भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग दुरुस्त करण्यासंदर्भात लवकरच आंदोलन करू असेही
सांगितले.तसेच पडघा विभागातील स्थानिक शेतकरी भूमिपुत्र बांधवांना प्रत्येक
क्षेत्रात प्रथम प्राधान्य मिळविण्यासाठी सदैव प्रयत्न करू आणि स्थानिक बांधवांवर
कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तसेच जर कोणी स्थानिक बांधवांवर अन्याय
करण्याचा प्रयत्न केला तर जिजाऊ संघटना संघटना पुर्णपणे स्थनिक भूमीपुत्रांच्या
सोबत खंबीरपणे उभी राहील.असेही जिजाऊ संघटनेचे संथापक निलेश सांबरे म्हणाले.
Post a comment