BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहरात दोन्ही बाजुंनी व्यापारी गाले सुसज्ज उभे राहिल्याने
मुरबाड शहाराचे मुख्यप्रवेशद्वार मुरबाड नगरपंचायतीचे तात्कालीन नगराध्यक्ष किसन अनंत
कथोरे यांच्या कालावधीत बांधकाम आले.त्यांचे लोकार्पण सोहळा आमदार किसनराव कथोरे यांच्या
हस्ते 15 ऑगस्ट दिनी करण्यात आले.
या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भुषण डॉ.श्री.नानासाहेब
धर्माधिकारी असे नाव देण्यात आले आहे.या प्रवेशद्वारालगत कल्याण मुरबाड हायवे जात असून
हायवेच्या चौकाला माजी महसुलमंत्री कै.शांताराम घोलप यांचे नाव देण्यात येणार असल्याचे
वृत्त आहे यावेळी माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी,नगराध्यक्ष,नगरसेवक
अन्य मान्य उपस्थित होते.
Post a comment